चौफेर न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांच्या सोबतीने स्वराज्याची स्थापना करून राज्यकारभार चालविला, असे प्रतिपादन प्राचार्य वैशाली लाडे यांनी व्यक्त केले. प्रचिती प्री- प्रायमरी स्कुल पिंपळनेर येथे शिवजयंती ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

दरम्यान, शिवरायांचे तेजस्वी प्रतिकात्मक चित्र रांगोळीतून रेखाटून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे व समन्वयक राहुल अहिरे होते. सरस्वती व शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी, शिवाजी महाराजांची भूमिका अर्निय दशपुते व नैतिक सोनवणे यांनी स्वीकारली. तसेच, सर्व विद्यार्थ्यांनी मावळ्यांची वेशभूषा केली. यासह विद्यार्थीनींनी नववार साडी नेसून कार्यक्रमाची शोभा वाढविली. दरम्यान, विजयीउत्सवाचे नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. नर्सरीची विद्यार्थीनी अवनी पवार हिने शिवरायांची थोरवी तिच्या मधूर वाणीतून सांगितली. अर्णव बिरारीस, तेजस निकम व पूर्वोवशी भदाणे यांनी शिवरायांचे बालपणातील प्रसंग आपल्या भाषणातून मांडले. शिक्षीका निलीमा देसले यांनी अफजल खानचा वध या प्रसंगातून शिवाजी महाराजांची चतुरता सांगितली. समन्वयक राहुल अहिरे यांनी शिवाजी महाराजांचा जन्म, बालपण, तसेच जिवनातील प्रसंग सांगून शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा केला. सुत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. तसेच, कार्यक्रमाची सांगता पूजन तवर यांनी केली. प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, अश्विनी पगार, पूनम बिरारीस, पूनम तवर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, जयेश घरटे, संगिता कोठावदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four − two =