चौफेर न्यूज – मागील ३ वर्षांपासून शिक्षण विभागाच्या धोरणामुळे रखडलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला १८ फेब्रुवारीचा मुहूर्त मिळाला आहे. यासाठीचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. राज्यभरातील ६ हजार १७७ केंद्रांवर पाचवी-आठवीची ही परीक्षा घेतली जाणार असून एकूण ८ लाख ५८ हजार ४६५ विद्यार्थी ही परीक्षा देतील.

आधी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीच शिक्षण विभागाक़डून शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात येत होती. त्यानंतर २०१५ पासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)साठी ४ लाख ८८ हजार ४७० तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) परीक्षेसाठी ३ लाख ५८ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेत आमूलाग्र बदल करण्यासाठी यापूर्वी सुरू असलेल्या चौथी आणि सातवीच्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करून त्या पाचवी आणि आठवीच्या वर्गातील मुलांसाठी घेण्याचा निर्णय ३ वर्षांपूर्वी घेतला होता. या निर्णयानंतर या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यासाठीच्या समित्या यांच्या गोंधळामुळे मागील ३ वर्षे या शिष्यवृत्ती परीक्षा अडचणीत आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × one =