शिरपूर (दि. 30 मार्च 2017) :  शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या थकीत प्रॉव्हीडंट फंडबाबत (पी.एफ) नवी दिल्ली येथील पी.एफ. ट्रीब्युनल कोर्टने स्थगिती आदेश दिला आहे. कारखान्याच्या बाजूने निकाल लागल्याची बाब समाधानकारक आहे, असे चेअरमन माधवराव पाटील यांनी सांगितले.

याकामी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक माजी शिक्षण मंत्री आ. अमरिशभाई पटेल तसेच चेअरमन माधवराव पाटील, व्हा.चेअरमन दिलीप पटेल, सर्वसंचालक यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या थकीत प्रॉव्हीडंट फंडचा विषय, तसेच इतर अनेक गुंतागुतीचे मुद्दे सोडविण्यासाठी कारखान्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.पी.एफ.च्या थकीत रकमेपोटी ५ कोटी रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.

याबाबत न्याय मिळण्यासाठी साखर कारखान्यातर्फे नवी दिल्ली येथील ट्रीब्युनल कोर्टमध्ये धाव घेण्यात आली. या ट्रीब्युनल कोर्टने पी.एफ.खात्याकडून सुरु केलेल्या वसुली प्रक्रियेला म्हणजेच दि. २ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या पी.एफ.खात्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

नवी दिल्ली येथील ट्रीब्युनल कोर्टने म्हटले आहे की, धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या ताब्यात शिरपूर साखर कारखान्याचे सर्व चल- अचल संपत्ती तसेच सर्व कागदपत्रांचे रेकॉर्ड असल्याने व कारखान्याच्या बंद कालावधीत कामगारांना काहीएक वेतन अदा न केल्याने या सर्व बाबतीत पी.एफ. भरणा करण्याचा मुद्दा आला आहे.

पी.एफ. खात्याने मार्च २००३ ते एप्रिल २०११ पर्यंत रक्कम १४ कोटी रुपये दर्शवली आहे. २०११-२०१२ या एकाच वर्षातील पी.एफ. थकबाकीची १८ कोटी रुपयांची रक्कम संशयास्पद आहे. तसेच कारखान्याकडून २००३ ते २०११ या कालावधीत ५.१८ कोटी रुपयांची रक्कम भरल्याचेही म्हटले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर साखर कारखान्याकडे असलेली सर्व थकबाकी संबंधीची व कारखान्याने भरलेल्या रकमेची कागदपत्रे घेवून नाशिक येथील पी.एफ. खात्याने दि.२८ एप्रिल २०१७ रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ट्रीब्युनल कोर्टने पी.एफ. खात्याच्या दि.२ नोंव्हबर २०१५ रोजीच्या कारवाई करण्याच्या आदेशाला स्थगिती आदेश दिला आहे.

नवी दिल्ली येथील ट्रीब्युनल कोर्टचे प्रिसायडींग ऑफीसर हरिष गुप्ता यांनी हा आदेश दिला असून कारखान्यातर्फे दिल्ली येथील ऍड.एस.सी. वर्मा यांनी कामकाज पाहिले. त्यांना मुंबई येथील ऍड.हिरेन छेडा यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + 3 =