चौफेर न्यूज – सांगवी परिसरातून जाणाऱ्या मुळा व पवना नदीत गेल्या काही दिवसांपासून जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलपर्णी काढण्याबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही काहीच कारवाई होत नाही. येथील नागरिक त्रस्त झाले असून विविध आजारांचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे युवक  कॉंग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुभमुहूर्त पाहून जलपर्णी काढावी, अशी उपरोधिक मागणी करत पंचाग भेट दिले.

याबाबत युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त  हर्डीकर यांची भेट घेवून निवेदन दिले.  सांगवी भागातून मुळा व पवना नदी जाते. या नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून जलपर्णी मोठ्या प्रमाणात झाली आहे. जलपर्णी वेळेवर न काढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका कोणत्या शुभ मुहूर्ताची वाट पाहत आहे, अशी टीका करत कॉंग्रेसच्या वतीने आयुक्तांना पंचाग भेट दिले.  यावेळी मावळ लोकसभा युवकचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, कुंदन कसबे, मयुर जयस्वाल, हिरा जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 1 =