पिंपळनेर (दि. 03 एप्रिल 2017) :  कमी पाण्यात जास्त सिंचन व जास्त उत्पन्नासाठी नियोजन करता येवू शकते, त्यासाठी पाणी वापर संस्थांनी आपल्या भागातील पाटचार्‍या ताब्यात घेण्याचे आवाहन जल व भूमी व्यवस्थापन वाल्मीक संस्था औरंगाबादच्या सहयोगी प्रा. विद्या पुरंदरे यांनी केले.

पिंपळनेर येथे एकविरा देवी मंदिराच्या सभागृहात लाटीपाडा धरणाच्या कॅनॉलवरील पाणी वापर संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी मार्गदर्शन करतांना केले.

अध्यक्षस्थानी उपविभागीय अभियंता पाटबंधारे के.व्ही.सोनार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाखा अभियंता एम.आर.भामरे, स्थापत्य व्यवस्थापक एस.बी.हिरे, आर.बी.बिरारीस, वाल्मी संस्था औरंगाबादचे सहा. प्रा. मनोहर धादवड, प्रा. अजित निर्मल, कृषी सहाय्यक एच.डी. बाविस्कर, पी.व्ही.पवार उपस्थित होते.

यावेळी एकवीरा पाणी वापर संस्थेचे चेअरमन व्ही.एन.जिरे यांनी पाटबंधारे अधिकार्‍यांना सांगितले की, प्रथम चार्‍यांचे कामे झालेले नाहीत ते व्हावे, आऊटलेट हे लिकप्रुप असावे, आऊटलेट क्षेत्र मर्यादीत असावे, ८ हेक्टरलाच परवानगी असावी तसेच शेतकर्‍यांनीही नियमांचे पालन करावे, टेलवर असलेल्या शेतकर्‍यांना आधी पाणी द्यावे नंतर हेडकडे असणार्‍यांनी पाणी घ्यावे, हल्ली एका आऊटलेटला २५ हेक्टर क्षेत्र असल्याने प्रत्येकाला पाणी मिळत नाही अशा अनेक समस्या सांगितल्या.

तर शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भटू जिभाऊ आकलाडे यांनी आधी पाटचार्‍यांचे व आऊट लेटचे काम करुन द्या, तरच आम्ही पाटचार्‍या ताब्यात घेवू असे सांगितले. सुभाष जगताप यांनी लाटीपाडा धरणाच्या पाण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त क्षेत्राला पाणी देवू नये त्यामुळे प्रथम लाभार्थी शेतकरी देखील वंचित रहातात तर डाव्या कालव्याचे पुर्ण व व्यवस्थीत काम झालेले नाही, पाटचार्‍या नादुरुस्त आहेत तर रोड क्रॉसिंग नसल्याने शेतीपर्यंत पाणी निट पोहचत नाही असे सांगितले.

यावर उपअभियंता सोनार यांनी मुख्य कॅनल व मुख्य चार्‍या दुरुस्तीसाठी निधीप्राप्त झाल्यावर दुरुस्त करुन मिळतील पण ज्या दुरुस्त आहेत त्या ताब्यात घेण्याचे आवाहन केले.

यावेळी दिलीप घरटे, सुदाम पगारे, शंकर खैरनार, विश्‍वनाथ पाटील, केदा पंडीत खैरनार, गोकुळ वाणी, व्ही.एम.जिरे, भटू आकलाडे यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या.

यावर जल भूमी व्यवस्थापन वाल्मी औरंगाबादच्या प्रा.विद्या पुरंदरे म्हणाल्या, तुम्ही तुमच्या पाणी वापर संस्थांनी आधी पाटचार्‍या ताब्यात घ्याव्या. त्या पाण्यावर तुमचा अधिकार राहणार असून तुमच्या नियोजनावर शेतीला पाणी मिळेल. नंतर तुम्हाला तुमच्या हक्काच्या पाण्यावर जिल्हाधिकारीही परस्पर निर्णय घेवू शकणार नाहीत. त्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येवून निर्णय घेणे महत्वाचे आहे.

त्यासाठी वाघाडची पाणी वापर संस्था शेतकर्‍यांनी बघून आपल्याकडे निर्णय घ्या. आमची वाल्मी संस्थेनी श्रशेतकरी, पाणीवापर संस्था व पाटबंधारे विभागाच्या सर्व समस्या ऐकून तुमच्या रास्त मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहचवूअसे सांगितले. यावेळी प्रा. मनोहर धादवड मार्गदर्शन केले.

शेतकरी व पाणी वापर संस्थेतर्फे वाल्मी संस्था औरंगाबाद व पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे आभार सुभाष जगताप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − two =