विराटला विश्रांती; रोहित शर्मा भारताचा नवीन कर्णधार

चौफेर न्यूज – नागपूर कसोटीत श्रीलंकेवर मात केल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. गेले काही महिने सलग क्रिकेट खेळणाऱ्या भारताचा कर्णधार विराट कोहलीला वन-डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. वन-डे मालिकेसाठी रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. याचसोबत वन-डे मालिकेसाठी सिद्धार्थ कौलचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. विराट कोहलीला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती, मात्र तिसऱ्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हाती संघाचे नेतृत्व देण्यात आलेलं आहे.

असा असेल श्रीलंकेविरुद्ध भारताचा वन-डे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल.

तिसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि विजय शंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − three =