पिंपरी :  सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूराने चांगलेच थैमान घातले. हजारों लोकांचे संसार पूराच्या पाण्यात वाहून गेले. अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली. आता या भागातील नागरिक उरलेली जनावरे वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. या जनावरांना चाऱ्याची मोठी कमतरता भासू लागली आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील मित्र परिवाराच्यावतीने मदतीचा एक हात दिला आहे. त्या जनावरांसाठी आज एक ट्रक भरून कडबा-कुट्टी पाठविण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, विजय लोखंडे, सुनिल गव्हाणे तसेच पिंपरी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हा ट्रक पाठवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × two =