ब्रह्यकुमारी शिवानी; रहाटणीत रेडिओ स्टेशनचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड : ‘आपण जे ऐकता, बघतो आणि वाचत असतो त्याचप्रमाणे आपले विचार बनतात आणि जे विचार करतो त्याचप्रमाणे आपले भाग्य बनत असते. असे प्र
तिपादन नुकत्याच नारी शक्ती पुरस्कार प्राप्त झालेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी यांनी केले. वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअल ट्रस्टद्वारे रहाटणी येथे क
म्युनिटी रेडिओ “पुणेरी आवाज’’च्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माऊंट आबू हून बी.के.करुणा, बी.के.यशवंत उपस्थित होते. तसेच कृष्णकुमार गोयल,
ब्रह्माकुमारी उर्मिला, बी.के. नरेश, चंद्रकांत नखाते, बी.के.रमेश, वर्षा हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
आनंद देण्याचा विचार ठेवा…
ब्रह्माकुमारी शिवानी पुढे म्हणाल्या की, आपण मनाला ज्या सूचना करतो मन त्याचप्रमाणे चालत असते. ज्याप्रमाणे शरीराची, घराची आपण सफाई दररोज करतो तशी
मनाची देखील रोज सफाई केली पाहिजे. ज्या वाईट आणि दुःखद घटना आहे. त्यांना मनातून डिलीट करा. अनेक वर्षापासून जपून ठेवल्यामुळेच त्याची आठवण झाली की
त्रास होतो. आज एकामेकांच्या कटू वचनामुळेच जगाचे वातावरण दूषित झाले आहे, घरातील वातावरण बनविणे हे आपल्याच हातात आहे. चिंता सोडून सकारात्मक
विचारांची जोपासना करा. त्याचा परिणाम घरातील इतरांवरही चांगले संस्कार होईल. आंनदी राहणे, आनंद देणे हाच आपला विचार असला पाहिजे. बी. के. करुणा यांनी
सांगितले. या रेडिओद्वारे लोकांना सकारात्मक विचार ऐकण्याची संधी मिळेल, अनेक कलावंताना आपली कला सादर करता येईल. पुणे जी.पी.ओ. सेवाकेंद्राच्या संचालिका
उर्मिला दीदी यांनी शुभेच्छा वक्त करून “खुश रहो और खुशिया बाटो’’ हा उपस्थितांना संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 4 =