बंगळुरू :   भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारताने बाजी मारली तरी, विराट कोहलीला या मालिकेत काही कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे काल सामना संपल्यानंतर विराटला प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागला.  यावेळी विराटने असे काही उत्तर दिले की ऐकणारे गप्प झाले.
प्रश्नांचा भडिमार झाल्यावर विराट म्हणाला, “मी आयपीएलमध्ये सलामीला येऊन फलंदाजी केली होती. त्यावेळी मी चार शतके देखील फटकावली. तेव्हा कुणी काहीच बोलले नाही, आता एक दोन सामन्यात धावा झाल्या नाहीत तर अडचण झाली का? संघात अन्य दहा खेळाडूदेखील आहेत. त्यांच्याकडेही लक्ष द्या. सगळे काही मीच केले तर बाकीचे काय करणार?”
“मी दोन्ही सामन्यात 70 धावा फटकावल्या असत्या तर तुम्ही आज माझ्यावर प्रश्वांची सरबत्ती केली असती का? बरोबर बोलत आहे ना मी. मग आता मालिकाविजयाचा आनंद लुटा,” असा टोलाही विराटने हाणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × one =