चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड मधील संस्कार प्रतिष्ठान वतीने दर वर्षी दिला जाणारा राज्यस्तरिय श्री स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार यावर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांना प्रदान करण्यात आला.

नुकतेच चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सचिन चिखले यांना चिंचवडे उप पोलीस निरिक्षक प्रदिप लोंढे, सिंम्बा चित्रपटातील अभिनेते सौरभ गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे, सुनिता गायकवाड, नगरसेवक नामदेव ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सचिन चिखले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चिखले यांच्यावर सर्वच स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =