पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी अनेक आंदोलने केलीत. आजही सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले. सत्तेत असूनही अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळे केवळ ‘स्टंटबाजी’साठीच हे आंदोलन केल्याची चर्चा रंगू लागली आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी आज नेहरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले. यावेळी स्वीकृत नगरसेवक माऊली थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले…

पिंपरी चिंचवड शहाराला गेल्या आठवड्यात गुरुवारपासून दररोज पाणीपुरवठा सुरु केला आहे. पवना धरण पूर्ण भरल आहे. महापौरांनी त्यामुळे दररोज पाणी पुरवठ्याचे आदेश दिले आहेत. शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल असेही त्यांनी सांगितले आहे. परंतू पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने पाणी वितरणामध्ये अडचण येत असून उंचावरील भागात पाणी जाण्यास अडचणी येत आहेत. संत तुकारामनगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत सुजाता पालांडे यांनी आज नेहरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले.

प्रशासन जुमानत नाहीत…

दरम्यान, सत्तेत असलेल्या नगरसेविकेने अशा पध्दतीने आंदोलन केल्याने वेगळीच चर्चा सुरू आहे. सत्तेतल्या नगरसेवकांना प्रशासन जुमानत नाही का? असा सवालही उपस्थित होत आहे. मुळातच आंदोलने ही विरोधकांनी करायची असतात. परंतू सत्ताधारी हेच आंदोलन करत असल्यामुळे ती केवळ ‘स्टंटबाजी’ होतेयं की काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 15 =