चौफेर न्यूज पिंपरी चिंचवड महापालिकेत अनेक चुकीची कामे होत आहेत. अशा कामांना त्वरित विरोध करा, त्याच्या विरोधात आक्रमकपणे आवाज उठवा. महापालिकेत सर्रासपणे जादा दराच्या निविदा स्वीकारल्या जात असून त्याला प्रखर विरोध व्हायला हवा. सत्ताधार्‍यांकडून होणारी चुकीची कामे जनतेसमोर मांडा, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवक, नगरसेविकांना दिल्या. लोकसभा निवडणूक जवळ आली असून त्यादृष्टीने कामाला लागण्याचे निर्देशही त्यांनी पदाधिकार्‍यांना दिले. दरम्यान, मावळ लोकसभेचा उमेदवार पवार साहेब ठरविणार असल्याचे सांगत उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पक्ष संघटनेचा आणि नगरसेवक, नगरसेविका यांच्या कामकाजाचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि. 9) बारामती गेस्ट हाऊस येथे आढावा घेतला. या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. शहरातील पक्ष बांधणी, बूथ कमिटी, नगरसेवकांची कोणती विकासकामे प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांची कामे होत आहेत का? याचा बैठकीत अजित पवार यांनी आढावा घेतला. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आहे का?, मेट्रोचे काम, विविध विकासमाकांचा आढावा घेतला.

महापालिकेत अनेक प्रकारचे चुकीचे कामे होत आहेत. त्याच्या विरोधात आवाज उठविला जात नसल्याच्या तक्रारी होत आहेत. प्रत्येक चुकीच्या गोष्टीवार आक्रमकपणे आवाज उठविणे आवश्यक आहे. जादा दराच्या निविदा स्वीकारल्या जात आहेत. त्याला प्रखर विरोध करा. चुकीची कामे जनतेपर्यंत पोहचवा, अशा सूचना पवार यांनी नगरसेवकांना दिल्या. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ आली असून वेळ कमी आहे. त्यानुसार कामाला लागा. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कामाला सुरुवात करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मावळ लोकसभेचा उमेदवार योग्य वेळी जाहीर केला जाईल. पवार साहेब उमेदवार ठरविणार आहेत. उमेदवार कोण असेल याचा विचार करत न बसता कामाला सुरुवात करावी. लोकसभा, विधानभा आणि स्थानिक पातळीच्या निवडणुका वेगळ्या असतात. राष्ट्रवादीची सत्ता असताना केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. परंतु, मावळातून उमेदवार कोण असेल याचा सस्पेन्स पवार यांनी कायम ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × two =