चौफेर न्यूज – देशात बेरोजगारीचे वास्तव भीषण आहे. अनेक राज्यांमध्ये छोटयात छोटया पदाच्या सरकारी नोकरीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए झालेले तरुण-तरुणी अर्ज करत आहेत. तामिळनाडू विधानसभेत सफाई कामगारांच्या १४ जागांसाठी एम टेक, बी टेक, एमबीए, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या तरुण-तरुणींनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

२६ सप्टेंबरला तामिळनाडू विधानसभा सचिवालयाने ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करणारा उमेदवार शारीरिक दुष्टया तंदुरुस्त असावा तसेच त्याने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असावीत या दोनच अटी ठेवण्यात आल्या होत्या. एम्पलॉयमेंट एक्सचेंजकडून तामिळनाडू सचिवालयाला ४,६०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. निकषात न बसणारे फक्त ६७७ अर्ज फेटाळण्यात आले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा रोजगारासंबंधी अहवाल लीक झाला होता. त्यामध्ये मागच्या ४५ वर्षात २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता असे या अहवालात म्हटले होते. पण नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी हा अहवाल फेटाळून लावला. अहवालातील नोकऱ्या संदर्भातील माहिती अधिकृत नसून त्याची पडताळणी झालेली नाही असे नीती आयोगाकडून सांगण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 + twelve =