चौफेर न्यूज – २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी समविचारी पक्षांनी युती करणे गरजेचे आहे. भाजपला आव्हान द्यायचे असेल तर समविचारी पक्षांनी वज्रमूठ बांधणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समविचारी पक्षांच्या एकत्र येण्याने तगडे आव्हान निर्माण होईल आणि भाजपला पराभूत करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की शेतकरी, मध्यमवर्गीय आणि तरुणाईमध्ये सद्यस्थितीत असंतोष खदखदत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही. हे सरकार लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरू शकलेले नाही. मोदींना तरुणांना रोजगार देण्यात अपयश आले, असे पवार म्हणाले. आजच्या स्थितीनुसार संसदेत मोदी यांची स्थिती मजबूत आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. पण शेतीप्रधान समाज, मध्यमवर्गीय, अल्पसंख्याक, तरुण वर्ग या सरकारवर नाखूश आहे, असे शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + eighteen =