चौफेर न्यूज – सरदार वल्लभभाई पटेल यांचे देश स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी देशातील नागरिकांना जोडण्याचे काम केल्याचे प्रतिपादन प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अतुल देव यांनी केले.

प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्रीमध्ये दि.३१ ऑक्टोबर रोजी भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी काढून उत्कृष्ठ फलक लेखन करण्यात आले. यावेळी शाळेचे व्यवस्थापक तुषार देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक मनन बेग, भाग्यश्री बेडसे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यांनी शाळेच्या पटांगणात दौडला सुरुवात झाली. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकतेचा संदेश दिला. तसेच, शिक्षिका वैष्णवी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. तसेच शिक्षिका वैशाली पाटील यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे घोषवाक्य विद्यार्थ्यांकडून वदवून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वैष्णवी सोनवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × five =