चौफेर न्यूज –  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी ‘श्रींचा’ पालखी रथ ओढण्यासाठी मानाची ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल झाली आहे. शेतकरी रामकृष्ण घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीस हा मान मिळाला आहे. ‘सर्जा-राजा’ आळंदीत आल्याने ही बैलजोडी बघण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. पालखी समितीने येथील शेतकरी घुंडरे यांना यावर्षीची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी ८ अर्ज आले होते. रथाला बैलजोडी देण्यासाठी घुंडरे पाटील यांना संधी देण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी राज्याभर फिरून ही बैलजोडी खरेदी केली. वाई, बावधन या गावातून प्रत्येकी एक एक बैल घेत जोडी खरेदी केली. ही बैलजोडी पांढरीशुभ्र, वशिंड लक्षवेधी, शिंगाने अधिक भारदस्त आहेत.

आळंदीचे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, रामकृष्ण घुंडरे, सचिन घुंडरे म्हणाले की, यावर्षी श्रींच्या सेवेची संधी मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे. सर्जा-राजाची सेवा, त्यांचा खुराक, पशुवैद्यकीय तपासणी नियमित केली जाणार आहे. तसेच सर्जा-राजा शिवाय अजून एक बैलजोडी पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवली आहे. सर्जा-राजाची बैलजोडी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेणार आहे. त्यांच्यामुळे या वर्षी पालखी सोहळ्याची शान नक्कीच वाढणार आहे.

०००००००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × five =