????????????????????????????????????

 

सामाजिक क्षेत्रातील 900 नागरिकांचा जाहीर सत्कार

पिंपरी : शहरं मोठी होत असताना नागरिकांच्या समस्याही वाढत आहेत. सामान्यांची कामे झाली तरच महानगरीचे स्वप्न पूर्ण होते, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले. महापौर म्हणून कोणताही भेदभाव न करता आपण सर्वांची कामे केली, असेही त्या म्हणाल्या.

पिंपळेनिलख येथील कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रातील 900 नागरिकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक विनायक गायकवाड, तळेगावच्या संध्या भेगडे, भारती पठारे, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष व भाजपचे शहर उपाध्यक्ष सुरेश चोंधे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप कस्पटे, उपप्रादेशिक परिवहन विभगाचे माजी सहारक आरुक्त प्रकाश बालवडकर, नितीन इंगवले, सुरेश गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप या वेळी म्हणाले की, तळागाळातून मोठ्या झालेल्या माणसाला तळागाळातील लोकांविषयी जाण असते. भौतिक अर्थाने परिसर विकसित व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केलेच पाहिजेत.

उच्च दर्जाचे क्रीडा संकूल या परिसरात उभे केले असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवणारे खेळाडू तयार होतील अशी अपेक्षा आहे. याप्रसंगी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नगरसेविका आरती चोंधे यांच्या कामाचा विशेष गौरव केला.

स्मशानभूमी, उद्यान, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर लाईन, बीआरटीएस, स्वच्छतागृहे, वाय जंक्शन, एलइडी दिवे, पेव्हिंग ब्लॉक, शाळा, मंदिर, दवाखाने इमारतींची दुरुस्ती, आठवडे बाजार, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, रस्ते दुरुस्ती, डीपी रस्ता, घाटाचे सुशोभीकरण, शैक्षणिक सुविधा, साफसफाई अशा केलेल्या विविध विकासकामांची माहिती या वेळी देण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 1 =