पिंपरी-चिंचवड येथील  पी.आय. वर्गीस या उद्योजकाची कल्पना
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे यासाठी केवळ महापालिका प्रशासन झटत नाही तर शहरातील एका 71 वर्षीय उद्योजकानेही त्यासाठी आपली कल्पना लढवली आहे. त्यांनी शहरातील सोसायटींना मतदानाचे आवाहन केले असून ज्या सोसायटीमधून सर्वाधिक मतदान केले जाईल त्या सोसायटीला 9 फूट 6 इंचाची मोठी ट्रॉफी दिली जाणार आहे.
ही कल्पना आहे पी. आय. वर्गिस यांची. वर्गिस यांची नेहरुनगर येथे फायबरची कंपनी आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी मतदान करावे. यासाठी मतदारांना मतदानाचे आव्हान केले आहे. ज्यामध्ये त्यांनी सोसायटींना बक्षीसही देऊ केले आहे. मतदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणा-या सोसायटींना ते ट्रॉफी देणार आहेत. ही ट्रॉफी फायबर ग्लासची असून  ती वर्गिस यांच्या नेहरुनगर येथील  फॅक्ट्री येथे  बनवली. तिला बनविण्यासाठी 14 ते 15 कामगारांनी मेहनत घेतली आहे.
याविषी एमपीसी न्यूजशी बोलताना वर्गिस म्हणाले की, मला समाजासाठी काही तरी करावे असे कायम वाटते. मी त्यासाठी दर शुक्रवारी अन्नदान पण करतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत एक नागरिक म्हणून मतदाना पलीकडे आपले योगदान असावे, यासाठी मी ही कल्पना केली. ही जगातील सर्वात मोठी ट्रॉफी असावी. मी ही ट्रॉफी आता शहरातील विविध भागात मोटारगाडीवरून फिरवणार आहे. ज्यामुळे त्यातून जागृतीही होईल. तसेच ज्या सोसासायटींनी सर्वाधिक मतदान केले आहे. त्यांनी मला  9371040469 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
त्यामुळे नागरिकांनीही या कल्पनेला साथ देत महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवावी. तसेच आता 23 फेब्रुवारीनंतर ही ट्रॉफी कोणत्या सोसायटीमध्ये जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 2 =