कष्टकरी संघर्ष महासंघाने उठविला आवाज

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य माणसांसाठी गृहप्रकल्प योजना होऊ नयेत, म्हणून बांधकाम व्यावसायिक  विरोध करीत आहेत. त्यात शहरातील काही राजकारणी मंडळीही सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध झुगारुन गृहप्रकल्प पुर्ण करुन सर्वसामान्य घरांची योजना पुर्ण क रावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इरफान  चौधरी, चंद्रकांत कुंभार, सैफुल शेख, आबा शेलार, बालाजी इंगले, राजेश माने उपस्थित होते. प्रसंगी, महासंघाचे शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता अनिल सूर्यंवंशी  यांच्याशी चर्चा करण्यात आली.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाकडून गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना घरे देणार याविषयी अनेक वर्षापासून केवळ घोषणाच केली जात आहे.  गेल्या कित्येक वर्षानुवर्षे सर्वसामान्याना घराची आशा दाखवली जात होती. त्यामुळे नवनगर प्राधिकरणाने सेक्टर 30 आणि 32 याठिकाणी घराचा प्रकल्प सुरु केला आहे.  त्या प्रकल्पाला काही जणांकडून खोडा घालण्याचे काम सुरु आहे.

सन 2016 मध्ये पेठ क्रमांक 30 व 32 निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्प सुरु करण्याचे आदेश दिले. मात्र उद्घाटनापूर्वीच विविध कारणांनी त्यास विरोध झाला. यावेळी  महासंघाने आंदोलने करुन अखेर त्या कामास सुरूवात झाली, आता दुर्दैवाने तीन वर्षे उलटले तरीही केवळ 25% म्हणजे एक मजला व दोन मजली काम झाले आहे. हे क ाम करणार्‍या ठेकेदारास सुमारे 50 लाखाचा दंड लावला असला तरीही दंड लावून न थांबता काम पुढे झाले पाहिजे, अशी व्यवस्था करावी.

पेठ कृ.12 येथे होणारी सुमारे 5000 घरांची योजना विरोध विचारात न घेता सर्वसामान्याना घरे देण्याच्या उद्देशाने नियमाप्रमाणे काम लवकरात लवकर सुरु करावे, नागरिक ांना परवडणारी घरे द्यावीत, अशी मागणी यावेळी केली. अन्यथा कष्टकार्‍यांच्या योजनेसाठी आंदोलन करण्यात येईल. असाही इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =