चौफेर न्यूज – तब्बल २०० किलोमीटरची पायपीट करून नाशिकवरून मुंबईत धडकलेल्या शेतक-यांच्या लढय़ाला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतक-यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले आणि हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी झाला. मागण्या मान्य करण्याचे केवळ आश्वासन नको, तर लेखी हवे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. लेखी मागणे योग्य नाही, मात्र यापूर्वीचे दोन अनुभव चांगले नाहीत म्हणून लेखी आश्वासनाचा आग्रह आहे, असे आमदार जेपी गावित म्हणाले. मात्र, लेखी आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी यावर मंगळवारी सभागृहात निवेदन केले जाणार आहे, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन……

वनजमीन प्रश्न महत्त्वाचा आहे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. वन हक्क जमिनीचे दावे पुढच्या सहा महिन्यांत निकाली काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. २००६ पूर्वी जेवढी जागा असेल ती परत देऊ, अपात्र प्रकरणे पुन्हा तपासू, गहाळ झाल्याचा पुरावा असेल तर तोही ग्राह्य धरण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी विशेष टीम तयार करण्यात येणार आहे. मुख्य सचिव स्वत: आढावा घेतील आणि पुढच्या सहा महिन्यांत प्रकरणे निकाली निघतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − three =