चौफेर न्यूज –  काल विविध संघटनांच्या वत्तीने भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आता सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून आंदोलन करण्यात येत आहे.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्याचबरोबर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे आता मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सांगलीतील मारुती चौकात जमा झाले होते. तेथून ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. सध्या परिसरात प्रचंड तणाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 12 =