चौफेर न्यूज – ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्रपरिवारातर्फे  व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली भव्य शिवराज्याभिषेकाची गुढी नवी सांगवी येथील साई चौकात उभारण्यात आली.

ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे नवनाथ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या सहकार्याने आयोजित केलेले हे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी या ठिकाणी  शिवयोद्धा मर्दानी आखाडा,सांगवी यांच्या वतीने लाठीकाठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांच्या हस्ते मशालीचे प्रज्वलन करण्यात आले. शिवकीर्तनकार डॉ.गजानन वाव्हळ यांचे शिवकीर्तन झाले. यावेळी शिवकीर्तनातून भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नयनरम्य असा जीवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवकीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.  दरम्यान,  जुनला साई चौक येथे भारतीय सशस्त्र सेनेतील जवानांसाठी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मिलिटरी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर व ब्लड बॅंकेतर्फे रक्त संकलित केले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six − four =