पिंपरी (दि.13 फेब्रुवारी 2017) आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने अतुल शितोळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपले वडील नानासाहेब शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून उच्च तंत्रज्ञानाने विकसित केलेली प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केली. त्याचबरोबर शहरातील हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत सहभागी होण्यासाठी भेडसावणा-या अडचणी दूर करण्यासाठी सांगवीमध्ये ‘शहिद अशोक मारूतराव कामटे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका’ सुरु केली. महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 32 शितोळेनगर, सांगवी प्रभागातून अतुल नानासाहेब शितोळे, सुषमा राजेंद्र तनपुरे, ज्योती गणेश ढोरे, पंकज कांबळे यांना मतदार बहुसंख्य मताने निवडून देतील. असे माजी नगरसेविका मनिषा कुंभार यांनी गंगानगर सांगवी येथे सांगितले.
प्रभाग क्र. 32 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमदेवार अतुल नानासाहेब शितोळे, सुषमा राजेंद्र तनपुरे, ज्योती गणेश ढोरे, पंकज कांबळे यांनी सांगवी गंगा नगर, पवार नगर, शिंदे नगर, ढोरे नगर या परिसरात प्रचार फेरी काढून नागरीकांची संवाद साधला व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडूण देण्याचे आवाहन केले.
दोन वर्षापूर्वी सुरु झालेल्या या केंद्रातून दोन मुले आयआरएस पास झाले. तर एक मुलगी एमपीएससी परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम आली. अनेक मुले-मुली तलाठी आणि मंत्रालयात कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पास होऊन कामावर रुजू झाले. तसेच मनपा शाळा क्र. 49, 50 मध्ये ई-लर्निंग सुविधा सुरु करून दिली. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसते. स्पर्धा परिक्षेत सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आधुनिक ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे. तसेच इतर नागरिकांना वाचनाची गोडी आवड निर्माण व्हावी म्हणून अवघ्या पन्नास रुपयात कोणतेही पुस्तक उपलब्ध व्हावे म्हणनू भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचा देखील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. अशा लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रमांमुळे नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल नानासाहेब शितोळे आणि सुषमा राजेंद्र तनपुरे, ज्योती गणेश ढोरे, पंकज कांबळे यांना प्रभाग क्र. 32 शितोळेनगर, सांगवी प्रभागातून बहुसंख्य मताने निवडून देतील, असा विश्वास बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी सर्व सदस्यांबरोबर प्रकाश ढोरे, दिलीप कोरे, संजय चौधरी, दत्तात्रय काटे, भरत कारेकर, सुनिल क्षेत्रे, मनोहरदादा पवार, यतिन शिंदे, भुषण शिंदे आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 5 =