चौफेर न्यूज –  शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण आढळू लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आजार पसरणाऱ्या डासांचा उपद्रव शहरात वाढू लागतो. परंतु यावर्षी जलपर्णीमुळे ऑक्‍टोबर महिन्यापासून डासांचा उपद्रव आणि आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने शहरातील प्रत्येक ठिकाणी निरीक्षण आणि परिक्षण केले. या परिक्षण अहवालानुसार नदी प्रदूषण, जलपर्णी आणि डास उत्पत्तीमध्ये सांगवी परिसर सर्वांत पुढे आहे.

समितीने 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरला दापोडी, सांगवी, पिंपरी, काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी पवना नदी परिसर, देहू, आळंदी, इंद्रायणी नदी परिसर, प्राधिकरण, चिंचवडगाव, पिंपरी, आकुर्डी, रावेत, नेहरूनगर, पिंपळे-सौदागर, सांगवी, दापोडी परिसरातील खासगी, सरकारी दवाखाने व रुग्णालये यांची पाहाणी केली. अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयवंत श्रीखंडे, पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत, अर्चना घाळी, अँड. विद्या शिंदे, गौरी सरोदे,विभावरी इंगळे, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, राम सुर्वे, मंगेश घाग, अजय घाडी, सतीश मांडवे, समीर चिले, अमोल कानू, जयेंद्र मकवाना, बळीराम शेवते, विजय जगताप, राजेश बाबर, तेजस सापरिया, कपिल पवार, रामेश्वर गोहिल, सतीश मांडवे, अमृत महाजनी, उद्धव कुंभार, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले निरीक्षण पथकात होते. पथकाने काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 − 4 =