चौफेर न्यूज – विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व कळावे, मतदानाविषयी माहिती ज्ञात व्हावी, या दृष्टीकोनातून साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये यंदा प्रथम ऑनलाईन मतदान घेण्यात आले.  इ. ८ वीतील पात्र असणारे उमेदवार – ब्लु हाऊस – दिक्षांत सतिष पाटील (हॉकी). २. अर्चिता विजय रेलन (हॉकी). ग्रीन हाऊस – नेहा दिनेश गांगुर्डे (झाड), २. विवेक विलास भदाणे (झाड). रेड हाऊस – अभिजीत महेंद्रसिंग परदेशी (गुलाब). यलो हाऊस – हर्ष सुनील खैरनार (फुलबॉल), २) लुब्धा केतन देसले (फुटबॉल). या चार हाऊसमधील पात्र उमेदवारांनी आपापल्या चिन्हावर निवडणुक लढविली.

वर्षभरात शालेय सुव्यवस्था व्यवस्थापन व कामकाजासाठी तसेच शिस्तबद्धता, वर्ग नियंत्रणासाठी सहाय्य करू, असे विद्यार्थ्यांनी आश्वासन दिले. प्राचार्य अतुल देव व व्यवस्थापक तुषार देवरे यांच्या निरीक्षणाखाली प्रथम ऑनलाईन इलेक्शन घेण्यात आले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी देखील मतदान प्रक्रीयेत सहभाग घेतला. या ऑनलाईन निवडणुक प्रक्रीयेसाठी इ.१ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षीका योगिता देसले, ललित अहिरराव यांनी मार्गदर्शन केले. या मतदान प्रक्रीयेसाठी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. त्या उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सुविधांमुळे ही सर्व प्रकीया शक्य झाली. स्कूलच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. या मतदान प्रक्रीयेसाठी योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले. निवडणुक प्रक्रीयेत अंतर्गत इ. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत निवडणुकीचा आनंद घेतला.

याप्रसंगी इ. ५ अ मधील भाग्यश्री चोरडीया हिने प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथमच ऑनलाईन निवडणुकीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे प्राचार्य अतुल देव यांचे आभार मानले. इ.८ वीतील मोक्षा टाटीया हिने शालेय आवारात प्रथमच ऑनलाईन मतदान होत असल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. या इलेक्शनमुळे एक मत देखील बाद होणार नाही. मतदानाचा निकाल १०० टक्के लागेल, याची खात्री वाटते.

इ. १० वी तील मृदूल चौधरी – या मतदान प्रक्रीयेमुळे आपल्या आवडत्या उमेदवारास निवडून देण्यास सहाय्यता मिळाली. ऑनलाईन डिजीटल इलेक्शन असल्याकारणाने नरेंद्र मोदींनी राबविलेल्या इलेक्ट्रॉनिक इंडीया ही संकल्पना कळण्यास मदत झाली असून योजेनचा अनुभव आला.

इ.९ वी तील स्वामिनी देवरे हिने प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले की, यामुळे विद्यार्थ्यांना मतदानाविषयी माहिती मिळते. मतदान प्रक्रीया नागरिकशास्त्र या विषयाशी निगडीत आहे.

इ.९ वीतील विना कांकरिया हिने आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले की, ऑनलाईन इलेक्शनमुळे मतदानाविषयीची माहिती ज्ञात झाली. यामुळे कमी वेळात कमी खर्चात मतदान निर्णय मिळण्यास मदत झाली.

इ.१० वी तील दर्शना कांकरिया हिने प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले, मागील वर्षी निवडणुक प्रक्रियेत बरेच पेपर मतदानासाठी वाया गेले. या वर्षी ऑनलाईन प्रक्रीयेमुळे पेपर बचत झाली. पेपर कटींगमुळे वेळ व पेपर या दोन्ही गोष्टींचे नुकसान व्हायचे. यामुळे थोडा का असेना वृक्ष वाचवा चा संदेश आपल्या स्कूलमधून देता आला.

दुर्वा भामरे इ.७ वी विद्यार्थीनीने प्रतिक्रीया देताना सांगितले की, प्रथम घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन इलेक्शनमुळे आम्हाला मतदान प्रक्रीया चांगल्या पद्धतीने कळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × four =