चौफेर न्यूज –

साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव आणि व्यवस्थापक तुषार देवरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली.

याप्रसंगी, विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांबद्दलची माहिती आपल्या भाषणातून मांडली. यामध्ये पहिली वर्गातील अथर्व पाटील, राजलक्ष्मी भामरे इयत्ता ३ री, प्रियंका राजपूत, अध्ययन शिंदे, वेदांत भामरे, यज्ञश्री ठाकरे, तनुश्री वाणी, नेहा पाटील इयत्ता ४ थी, पूर्वा पाटील इयत्ता ५ वी आणि सहावी वर्गातील सानिया शाह, भूमिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, मुख्याध्यापक अतुल देव यांनी लोकमान्य टिळकांच्या जिवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरोधात कणखर नेतृत्व उभे केले. केसरी व मराठा या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी देशवासियांमध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरु करून विष्णु शास्त्री चिपळुणकर, आगरकर यांच्या सहकार्यांने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकहित व जनजागृतीसाठी तसेच स्वःहक्कासाठी लोकांना एकत्रित आणणे महत्त्वाचे असून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करून लोकांना एकत्रित आणले. इंग्रजांच्या तावडीत असताना त्यांनी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले. तर रांगोळी रेखाटन भाग्यश्री पाटील, सीमा मोरे, प्रियंका आहिरे, योगिता देसले यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × four =