शाळेच्या पटांगणात एकत्रित येवून विद्यार्थ्यांनी केला नाताळ सणाचा जल्लोष

 

साक्री ः प्रतिनिधी

साक्री येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कुलमध्ये केक कापून ख्रिसमस नाताळ सण साजरा करण्यात आला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सांता सोबत डान्स करून विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. दरम्यान, सुंदर अशी रांगोळी व फलक लेखन करण्यात आले. नाताळ या सणासाठी तयार केलेले सुंदर असे ख्रिसमस ट्री कार्यक्रमात आकर्षण ठरले. प्रसंगी, केक कापुन सांताचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी ख्रिसमसचे महत्व पटवून दिले. शाळेच्रा पटांगणात एकत्रित येवून विद्यार्थ्यांनी नाताळ सणाचा जल्लोष केला. नाताळ सण विषयक माहिती अनिता पाटील यांनी सादर केली. सर्वांना आवडणारा सांताक्लाजच्या आगमनाने विद्यार्थ्यांमधील उत्साह द्विगुणित झाला. नाताळ सण निमित्त मुलांना आवडणारे जिंगल बेल या बालगीतावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. नाताळ सण निमित्त सांताक्लाजतर्फे केक कापून विद्यार्थ्यांना आनंद द्विगुणित करण्यात आला. नाताळ सण निमीत्त लहीळीारी ीींशश वशलेीरींळेप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता पूनम बिरारीस रांनी आभार प्रदर्शनाने केली. अन्वी अहिरे या विद्यार्थिनीने कविता सादर केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + 14 =