साक्री तालुका भाजपाची मागणी

चौफेर न्यूज –

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा बँकेने साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही १० हजार रुपयांची उचल दिलेली नाही. पीक कर्ज रुपाने १० हजार रुपयांची उचल त्वरित देण्याची मागणी तालुका भाजपातर्फे जिल्हा बँक फॅक्टरी शाखा व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील, संजय अहिरराव, जिल्हा वसंतराव बच्छाव, मोहन सूर्यवंशी, विजय ठाकरे, राजेंद्र खैरनार, महेंद्र देसले, डॉ. देवेंद्र देवरे, प्रफुल्ल नेरकर, श्रीकांत भोसले, प्रा. युवराज काकुस्ते, गोरख बोराळे, ॲड. नरेंद्र मराठे आदी उपस्थित होते . कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना १० हजार रुपये उचल स्वरुपात देण्यासाठी बँकांना आदेश दिले आहेत. सर्व जिल्हा बँकांना शासनाने पैसेही उपलब्ध करून दिले असतांना आपल्या बँकेकडून शेतकऱ्यांना सहकार्य होत नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. बँकेने त्वरित उचल उपलब्ध करून दिली नाही तर भाजपातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + 16 =