चौफेर न्यूज प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री तालुक्यातील पहिली सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा ठरली आहे. दिल्ली येथील सीबीएसई बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, नवी दिल्ली ) साक्री तालुक्यातील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला मान्यता दिली आहे. शाळेला सीबीएसई अफिलीटेड क्रमांक – ११३०७५८ मिळाला असून ही शाळा साक्री (जि.धुळे) तालुक्यातील पहिली मान्यताप्राप्त शाळा बनली आहे.

शाळेची प्रशस्त अशी इमारत, प्रशस्त खेळाचे मैदान, फिजीक्स, मॅथ्स्‌, बायोलॉजी, केमिस्ट्री, आर्ट ॲन्ड क्राफ्ट आर्ट, कॉम्पुटर या विषयांच्या स्वतंत्र अशा अत्याधुनिक प्रशस्त प्रयोगाळा, प्रशस्त व सुविधायुक्त वर्ग, दहा हजार पुस्तके असलेले ग्रंथालय त्याचबरोबर क्रीडा विषयी विविध उपक्रम शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये राबविले जातात, त्याची दखल घेत दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाने ही परवानगी दिली आहे, पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे सन – २०१८-१९ चे पहिली ते सहावी पर्यंतचे प्रवेश संपले आहेत. आणि सातवी ते नववी वर्गाच्या मोजक्याच जागा शिल्लक आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकास होण्यासाठी व ज्ञानात भर पडावी. या दृष्टीकोनातून राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक असते. ही संधी विद्यार्थ्यांना प्रचिती इंटरनॅशनल स्कुलमध्ये उपलब्ध झाली आहे. प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसई संलग्नता मिळल्याने येथील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी दिली.

आधुनिक प्रशस्त व विस्तृत इमारत, पुर्व प्राथमिक मुलांसाठी प्रशस्त व आधुनिक साधन युक्त क्रीडांगण, शिस्तबद्ध वातावरणात मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्याकडे कल, सीबीएसई अभ्यासक्रम प्रशस्त व सुविधा युक्त वर्ग, ग्रंथालय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयाच्या स्वतंत्र्य प्रयोगशाळा स्कूलमध्ये आहेत. तसेच, प्रसज्ज व सुसज्ज अशी डिजीटल संगणक प्रयोगशाळा, व्यक्तिगत लक्ष देणारा पारंगत अनुभवी शिक्षक वर्ग कार्यरत आहे. स्कूलमध्ये वर्षभरात विद्यार्थ्यांचा मानसिक व शारिरीक विकास साधण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात विविध स्पर्धा परिक्षा स्कॉलरशीप, नवोद्य परिक्षा सर्व विषयांच्या राष्ट्रीय ऑलम्पियाड स्पर्धा परिक्षा जनरल नॉलेज, फ्लॅट (ऑनलाईन), विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी वेळोवेळी विविध मार्गदर्शनपर तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्याने आयोजित केले जातात. तसेच, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. भारतीय संस्कृतीची जाण व्हावी, यासाठी शाळेत सर्व जण व उत्सवांचे आयोजन केले जाते, असेही संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 + three =