चौफेर न्यूज – साक्री येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कुलमध्ये वार्षीक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा सोमवारी दि. १२ मार्च रोजी पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्कूलमार्फत शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी होत्या. यावेळी, संस्थेचे संस्थापक प्रशांत पाटील, शाळेचे व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, विद्यार्थी पालक आरती बागुल, अनुजा शेवाळे, जयश्री सोनवणे यांची उपस्थिती लाभली. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. वृषाली सोनवणे आणि प्रिती लाडे यांनी सुंदर रांगोळी, फलक लेखन करून रंगत आणली. दरम्यान, फन फेअर या कार्यक्रमात स्वीट डीश डेकोरेशन कॉम्पेटीशन स्पर्धेत आरती बागुल – प्रथम, अनुजा शेवाळे – द्वितीय, रोशनी सोनवणे – तृतीय तसेच जयश्री सोनवणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन श्वेता रौंदळ, स्नेहल पाटील यांनी केले. आभार भारती पवार यांनी मानले. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली शिक्षीका भारती पवार, श्वेता रौंदळ, वृषाली सोनवणे, सुनिता पाटील, प्रिती लाडे, प्रतिभा अहिरराव, स्नेहल पाटील, हिरल सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, दिपक अहिरे, शांताराम पगारे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − thirteen =