चौफेर न्यूज – साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुखकर्त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पुरोहित चंद्रात्रे यांच्या पौरोहित्याने गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

प्रमोद खैरनार, मनिषा खैरनार या दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा झाली. यावेळी, शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे उपस्थित होते. गणरायाच्या आगमनासाठी बाप्पाचे प्रत्यक्ष रुप रांगोळीतून हिरल सोनवणे, श्वेता सोनवणे यांनी रेखाटले.

सर्वांच्या आयुष्यातील आनंद विघ्नहर्त्यांच्या कानाइतका विशाल असावा. अडचणी उंदरा इतक्या लहान तर आयुष्य त्यांच्या सोंड इतके लांब असावे. आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावे, असा संदेश रांगोळीतून देण्यात आला. सेव्ह ट्री असा संदेश देणारे डेकोरेशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन वृषाली सोनवणे यांनी केले. प्राचार्या भारती पंजाबी, शिक्षीका श्वेता रौंदळ, पुनम पवार,  वृषाली सोनवणे, सुनिला पाटील, प्रिती लाडे, स्नेहल पाटील, हिरल सोनवणे, मनिषा खैरनार, सविता मोरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी जयश्री नांद्रे, बंदिश खैरनार, दिपक अहिरे, शांताराम पगारे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + eleven =