साक्री – अंधकाराला चिरुन प्रकाश निर्माण करणारा मांगल्याचे प्रतिक म्हणजे दिवा. अशाच अंधकाराचा  नाश करणारे प्रभु श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परततांना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. याच अनुशंगाने दीपोत्सव साजरा केला जातो. हाच ‘दीपोत्सव’ प्रचिती प्रि प्रायमरी स्कूल साक्री येथे साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलित करून अंधकाराचा नाश करण्याचा संदेश रांगोळीद्वारे देण्यात आला. तसेच लक्ष्मीचे चित्र फलक लेखनाद्वारे प्रदर्शित करण्यात आले. दीपोत्सवानिमित्ताने आकाशकंदील लावण्यात आला.  दरम्यान वसुबारस,  धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्व नाटीकांद्वारे दाखविण्यात आले. त्याप्रमाणे पूजेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील होते. प्राचार्या भारती पंजाबी, शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, प्रचिती प्रि प्रायमरी स्कूल, पिंपळनेर येथील शाळेचे व्यवस्थापक राहुल अहिरे यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका स्नेहल पाटील यांनी केले. दीपोत्सवात वसुबारस,  धनत्रयोदशी,  नरक चतुर्दशी,  लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे दिवस साजरे केले जातात. या प्रत्येक दिवसांचे महत्त्व आणि माहिती शाळेतील शिक्षिकांनी दिली. रावणावर विजय मिळवून अयोध्येत परततांना त्यांच्या वाटेवर अयोध्यावासियांनी दीप प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले. हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जात असल्याने त्याचे प्रात्यक्षिक नृत्याद्वारे प्रदर्शित करण्यात आले. तसेच, राम, लक्ष्मण, सीता व लक्ष्मी यांचे पूजन करण्यात आले.

 

गोरगरिबांना मिठाई, कपड्यांचे वाटप…

शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्याकडून दिवाळी निमित्ताने गरीब वस्तीमधील मुलांना मिठाईचे तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले. दीपोत्सवानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद द्विगुणित करण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी केली. अशाप्रकारे प्रचिती प्रि प्रायमरी स्कूल साक्री परिवारातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × two =