साक्री ः येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्रदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ’तिरंगी शुभेच्छा पत्र’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी सैनिक  प्रभाकर बच्छाव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, स्कूलच्या प्राचार्या भारतील पंजाबी उपस्थित होत्या.

स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये, विजेता –  यु के जी (लोटस्) – शिवाजी सोनवणे, मंजिरी ससले, राजवी अहिरराव, इशान  तडवी. उपविजेता – हर्षाली सोनवणे. एल् के जी (डायमंड) – निरज सोनवणे, धनश्री मोरे, निहारिका बोरसे, रिद्धी सोनवणे. उपविजेता – विश्‍वजीत सोनवणे.एल् के जी (गोल्ड) – युक्ता देसले, धैर्या शेवाळे, पुष्पांजली  भामरे. उपविजेता – तेजस्विनी खैरनार. नर्सरी – प्रथम सोनवणे, तनिष्क काकुस्ते, प्रणिती गांगुर्डे, स्वरा भदाणे. उपविजेता- शौर्य सोनवणे, निधी सदन. युकेजी (रोझ) – दुर्गेश मोरे, आरव देसले, शर्वरी नंदनवार. उपविजेता – प्रणित बागुल. पार्थ भदाणे. या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रसंगी, प्रभाकर बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता वुई शॉल ओव्हर कम या देशभक्तीपर गीताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − 11 =