चौफेर न्यूज – साक्री येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल साक्री येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी होत्या. सरस्वती पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारात राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. स्त्रियांना सर्व समान हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभारल्या. दरम्यान, राष्ट्रीय नेत्यांची ओळख शाळेतील शिक्षीका पूनम पवार यांनी करून दिली.

शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षीका भारती पवार, पूनम पवार, श्वेता रौंदळ, वृषाली सोनवणे, प्रिती लाडे, प्रतिभा अहिरराव, हिरल सोनवणे, स्नेहल पाटील, शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, शांताराम पगारे, दिपक अहिरे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांच्या उत्कृष्ट सहकार्याने कार्यक्रम साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन शिक्षीका भारती पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × three =