साक्री येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारासाठी आठवडा पोषण आहाराचे नियोजन करण्यात आले आहे. दि.०७ जुलै पासुन पोषण आहाराचे नियोजन झाले आहे.

प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये नवीन पोषण आहार योजना चालू केली आहे. तरी, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यास दर आठवड्याला पोषण आहार योजनेनुसार डबा देणे बंधनकारक आहे. सोमवार – इडली, डोसा, खमंग, आप्पे, मेदुवडा, पोहे, शिरा, बटाटवडा. मंगळवार – चपाती, हिरव्या भाज्या, पराठा, थालीपीठ. बुधवार – मसाला भात, दहीभात पुलाव, वरण भात, खिचडी, पिवळी खिचडी. गुरुवार – चपाती, कोरड्या भाज्या. शुक्रवार – चपाती, मोड आलेले कडधान्य, चने, चवळी, मसुर तसेच कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट. यानुसार, विद्यार्थी पालकांनी दैनंदिन वेळापत्रकानुसार पोषण आहारासह विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + 10 =