साक्री स्वातंत्र्यदिनानिमीत्त येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीची भावना जागृत करण्यात आली. तत्पूर्वी, निवृत्त सैनिक प्रभारक वामन बच्छाव यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. परेड संचलन करून शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना मंचावर आमंत्रित केले. तसेच, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामुहिक ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.

यावेळी शाळेतील शिक्षिका सुनिता पाटील यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची माहिती दिली. तसेच, स्वरा भामरे, मोक्षदा गांगुर्डे, अर्पित साळुंखे, निहारिका बोरसे या विद्यार्थ्यांनीची भाषणे झाली. युकेजीच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला व इंडियावाले या गाण्यावर नृत्य सादर केले.

शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांना अनुसरून स्वातंत्र्य सैनिक तसेच नृत्यांची भूमिका साकारली. यात हितांश मोहिते – महात्मा गांधी, मनस्वी शिरोदे – इंदिरा गांधी, दुर्गेश मोरे – लाल बहादुर शास्त्री, लौकिक देसले – महात्मा फुले, हितांश सोनवणे – लोकमान्य टिळक, लोकेश सोनवणे – चंद्रशेखर आझाद, प्रसन्न सोनवणे – सरदार वल्लभभाई पटेल, राजवी अहिरराव – राणी लक्ष्मीबाई, तनिष्का अहिरराव – सावित्रीबाई फुले, मयंक शिंदे – सुभाषचंद्र बोस, इशान तडवी – सुभाषचंद्र बोस, स्वरा भदाणे – भारत माता, आदित्य चव्हाण – चाचा नेहरु, आर्यन भदाणे – भगतसिंग या महापुरुषांच्या भूमिका साकारल्या.

त्यानंतर, ट्रीकलर या विषयावर शाळेअंतर्गत ग्रिटींग कार्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये नर्सरी – प्रथम सोनवणे, तनिष्का काकुस्ते, प्रणिती गांगुर्डे, शौर्य सोनवणे, निधी सदन. युकेजी (गोल्ड) – युक्ता देसले, धैर्या शेवाळे, पुष्पांजली भामरे, तेजस्विनी खैरनार. युकेजी (डायमंड) – निरज सोनवणे, धनश्री मोरे, निहारिका बोरसे, रिद्धी सोनवणे, विश्वजीत सोनवणे. युकेजी (रोझ) – दुर्गेश मोरे, आरव देसले, शर्वरी नंदनवार. युकेजी (लोटस्‌) – शिवाजी सोनवणे, मंजिरी ससले, राजवी अहिरराव / इशान तडवी, हर्षाली सोनवणे या विजयी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रसंगी, प्रभाकर बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता वुई शॉल ओव्हर कम या देशभक्तीपर गीताने झाली.

शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, शिक्षीका श्वेता रौंदळ, पूनम पवार, वृषाली सोनवणे, सुनिता पाटील, प्रिती लाडे, स्नेहल पाटील, हिरल सोनवणे, मनिषा खैरनार, सविता मोरे, शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, जयश्री बोरसे, दिपक अहिरे, शांताराम पगारे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, दत्ताभाऊ ठाकरे, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिनानिमीत्त आकर्षक फलक लेखन करण्यात आले होते. सुत्रसंचालन स्नेहल पाटील, संयोजन हिरल सोनवणे यांनी केले. आभार वृषाली सोनवणे यांनी मानले.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 2 =