साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये शुक्रवारी दि. १४ रोजी हिंदी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी तर व्यवस्थापक वैभव सोनवणे उपस्थित होते. यावेळी वर्गवारीनुसार हिंदी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे संयोजन मनिषा खैरनार यांनी केले. तसेच, हिंदी दिवसाची माहिती सुनीता पाटील, हिरल सोनवणे यांनी चिमुकल्यांना सांगितली.

यामध्ये नर्सरी – प्रथम – दिपीका ठाकरे, व्दितीय – आदित्य खैरनार, तृतीय – योगेश्वरी अहिरे, उत्तेजनार्थ – तनिष्का काकुस्ते. एलकेजी (गोल्ड) – तेजस्विनी खैरनार – प्रथम, वेदांत ससले – द्वितीय, हितेश ठाकरे – तृतीय, हर्षदा देवरे – उत्तेजनार्थ. युकेजी (डायमंड) – कार्तीक पवार – प्रथम, प्रणिती खैरनार – द्वितीय, याग्निक पाटील – तृतीय, लक्ष्मी देवरे – उत्तेजनार्थ. युकेजी (लोटस) – इशान तडवी – प्रथम, सोहम अहिरे – द्वितीय, योगिराज सोनवणे – तृतीय, हिमांशु देसले – उत्तेजनार्थ. युकेजी (रोझ) – दुर्गेश मोरे, भाविका देसले – द्वितीय, श्रावणी सोनवणे – तृतीय, मृणाल देसले – उत्तेजनार्थ, या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. प्राचार्या भारती पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + sixteen =