साक्री – येथील प्रचिती प्री – प्रायमरी स्कूल, साक्री येथे शुक्रवार दि. ३० रोजी शिक्षणातून विद्यार्थ्यांना रंगाची ओळख व्हावी, म्हणून पिंक डे तसे स्ट्रोरी टेलींग कॉम्पीटीशन (कथाकथन स्पर्धा) आयोजित करण्यात आली. पिंक डे निमीत्त आकर्षक असे फलक लेखन सुनिता पाटील व प्रिती लाडे यांनी रेखाटले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी भुषविले. व्यवस्थापक वैभव सोनवणे उपस्थित होते.

पिंक डे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संयोजन सविता मोरे यांनी केले. त्यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, संपूर्ण जगात, गुलाबी रंग प्रेमाणे प्रतिक म्हणून ओळखला जातो. गुलाबी रंगामुळे मनात नाजूक व कोमल भावना येत असतात. गुलाबी रंग हा स्त्री उर्जेचा असतो. म्हणजेच शिव आणि शक्ती उर्जेचा हळूवारपणाचा, नाजूकपणाचा व शुद्धतेचा आहे. नवरात्र उत्साहामध्ये या रंगाला अधिक महत्व असते. असे सविता मोरे यांनी सांगितले.

पिंक डे निमीत्त सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुलाबी रंगाच्या पोशाखात उपस्थित राहून कार्यक्रमात एकच आकर्षण ठरले.

 

पिंक डे या कार्यक्रमासोबतच कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नर्सरी – अनुश्री देशमुख(प्रथम) , प्रणिती गांगुर्डे (व्दितीय), शौर्य सोनवणे (तृतीय)

एलकेजी (डायमंड) – लक्ष्मी देवरे, निहारीका बारेसे, पार्थ सोनवणे, मानस देसले.

एलकेजी (गोल्ड) – धैर्या शेवाळे, आराध्या दसेले, आरोही देवरे, प्रांजल नांद्रे.

युकेजी (लोटस) – गुंजन पाटील, प्राप्ती वाघ, शिवाजी सोनवणे, राजवी अहिरराव.

युकेजी (रोझ) – मृणाल देसले. श्रावणी सोनवणे, शर्वरी नंदनवार / भावेश गांगुर्डे, अथर्व गवाळे या विद्यार्थ्यानी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 5 =