साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, साक्री येथे वनमहोत्सव व नवीन बालक पालक यांचा स्वागत समारंभ एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शनिवार दि. ०६ जुलै २०१९ रोजी झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. तत्पूर्वी, पालकांचे व विद्यार्थ्यांचे वाजत गाजत बैलगाडीतून मराठमोळ्या वेषभूषेत आगमन झाले.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गणेश येवले, अनिता पवार, शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे यावेळी उपस्थित होते. प्रसंगी, अतिथींचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, वनमहोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांनी वृक्षांची वेशभूषा साकारून दैनंदिन जीवनातील वनांचे महत्त्व सर्वांसमोर मांडले. मानवी जीवनातील झाडांचे उपयोग वृषाली सोनवणे यांनी विद्यार्थ्यांकडून कृतीद्वारे वदवून घेत वृक्ष संवर्धनाच्या घोषणा दिल्या.

तसेच, विद्यार्थ्यांचे मुकुट घालुन तर पालकांचे वृक्ष देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश येवले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी, शाळेची उद्दिष्ट्ये मनिषा बोरसे यांनी सर्वांसमोर मांडले. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्त्य साधून पालकांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वागताचा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन व कार्यक्रमाची रूपरेषा सुनिता पाटील यांनी सादर केली. प्रचिती प्री प्रायमरी स्कूल साक्री येथील प्रचिती परिवाराच्यावतीने तसेच सदस्यांच्या सहकार्याने वनमहोत्सव व स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

      

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − two =