साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पेपर, लाकडी काड्या, विविध टाकाऊ वस्तुंपासून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या अनेक वस्तूंपासून तरार केलेल्या कलाकृती रा प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.

कला शिक्षक रामचरन वैष्णव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य अतुल देव, तुषार देवरे आदी यावेळी उपस्थित होते.

कला शिक्षक वैष्णव यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण जोपासले पाहिजेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना विकसित होण्याची संधी दिली पाहिजे. येथील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती जणू आपल्याशी संवाद साधत आहे, असा भास होतो. विद्यार्थ्यांनी या सभागृहाची सजावटही अप्रतिम केली आहे.

प्राचार्य अतुल देव, तुषार देवरे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + fourteen =