चौफेर न्यूजजगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी लोकप्रिय आहे. पण धोनीचाही कधीतरी संयम सुटल्याचेही पहायला मिळाले आहे. सेंच्युरियन मैदानावर काल झालेल्या सामन्यातही असेच काहीसे घडले आणि त्याच्याबरोबर फलंदाजी करणाऱ्या मनिष पांडेवर धोनी संतापला आणि त्याने संतापाच्या भरातच अपशब्द वापरले. सध्या ट्विटवर याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काल झालेल्या सामन्यात धोनी आणि मनीष पांडेने ९८ धावांची नाबाद भागीदारी केली. १८८च्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत भारतीय संघाला पोहचवण्यासाठी दोघांनीही शेवटच्या पाच षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. भारताचा डाव सुरवातीलाच गडगडल्याने डावाला आकार देण्याची जवाबदारी या दोघांवर होती आणि ती त्यांनी पूर्णपणे निभावली. दोघे शेवटच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढत नाबाद राहिले. मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये धावा काढण्याचा दबाव दोन्ही फलंदाजांवर दिसून येत होता. धोनीच्या तोडून यामधूनच पांडेसाठी अपशब्द निघाले.

त्याचे झाले असे, पांडेने २०व्या षटकातील पहिल्या चेंडूंवर एक धाव काढली आणि धोनी स्टाइकर्स एण्डला गेला. गोलंदाज त्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार झाला तरी नॉन स्टाइकर्स एण्डला क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत हे पांडे पाहत होता. पांडेने प्रत्येक धाव महत्वाची असणाऱ्या सामन्यातील अशा क्षणी आपल्याकडे पहावे जेणेकरुन किती धावा पळायच्या आहेत किंवा इतर महत्वाचे संवाद त्याच्याबरोबर करता येईल असे धोनीला वाटत असल्याने त्याने थोड्या रागानेच पांडेला आपल्याकडे लक्ष देण्यास सांगितले. धोनी व्हायरल झालेल्या एका ट्विटमध्ये पांडेवर ओरडताना दिसत आहे. ‘ओए के इधर देख ले, उधर क्या देख रहा है. मै इधर खडा हू ना बॅटिंग कर रहा, असे धोनी रागाने म्हणाला. धोनीने नंतर या षटकामध्ये सतरा धावा काढल्याने भारताने धावफलकावर १८८ धावांचा टप्पा गाठला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × four =