पिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) सत्ताधारी पक्षात राहून वेळप्रसंगी सर्व सामान्य नागरीकांच्या हितासाठी पक्षाचा व्हिप नाकारण्याचे धाडस नगरसेवक संजय (नाना) काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात दाखविले. अशा गरीबांच्या कल्याणासाठी काम करणा-या सुशिक्षित उमेदवारासह प्रभाग क्र. 30 मधून शिवसेनेच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
दापोडी – कासारवाडी प्रभाग क्र. 30 मधील शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक संजय (नाना) केशव काटे, छाया तुषार नवले, शुभांगी प्रविण गायकवाड, गोपाळ प्रकाश मोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदयात्रेत शिवसेना विभाग प्रमुख तुषार नवले, हाजी शेख, उपविभाग प्रमुख चंद्रकांत शिंदे, चंद्रकांत काटे पाटील, अर्जुन लांडगे, एकनाथ हाके, शंकर कु-हाडकर, अनिल तारु, सुनिल ओव्हाळ, शिवा कु-हाडकर, राजू सोलापूरे, वामन कांबळे, जलाल शेख, मनोज उप्पार, बाळासाहेब जगताळे, विलास आण्णा काटे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
खा. बारणे पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मानधन वाढीस सभागृहात नगरसेवक संजय (नाना) काटे यांनी सत्ताधारी पक्षात असताना देखिल प्रखर विरोध करुन शहरातील कष्टकरी, गोरगरीब करदात्या नागरीकांचे आर्थिक हित जपले. पक्षाचा व्हिप असतानाही त्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे आणि भले सत्तेत असलो तरी चुकीच्या कामाला साथ देणार नाही असे सांगून सत्ताधा-यांचा रोष पत्कारला. संजय (नाना) काटे यांच्या भुमिकेमुळे पाशवी बहुमत असतानाही नगरसेवकांच्या मानधन वाढीचा हा विषय अखेर प्रशासनाला दप्तरी दाखल करावा लागला. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य विमा पॉलिसी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या ठरावास देखिल संजय (नाना) काटे यांनी विरोध करण्याचे धाडस दाखविले. त्यांनी स्वत: आणि कुटूंबियांसाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारी आरोग्य विमा पॉलिसी नाकारली. उलटपक्षी दापोडी, बोपखेल, फुगेवाडी परिसरातील रिक्षा चालकांसाठी आणि सफाई कर्मचा-यांसाठी स्वत:च्या खर्चाने आरोग्य विमा पॉलिसी सुरु करुन दिली. असे दातृत्व दाखविणारा युवा कार्यकर्ता संजय (नाना) काटे आणि दापोडी – कासारवाडी प्रभाग क्र. 30 मधील शिवसेनेचे उमेदवार  छाया तुषार नवले, शुभांगी प्रविण गायकवाड, गोपाळ प्रकाश मोरे यांना मतदार बहुमतांनी निवडून देतील अशी खात्री खा. बारणे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 4 =