चौफेर न्यूजहृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम ही नावे मराठी रसिकांना काही नवीन नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या विनोदी बादशहांना एकत्र आणत ‘सायकल’ या चित्रपटाचा प्रवास केला असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. लहान मुलगी हृषिकेषला सायकलची गोष्ट सांगण्याचा हट्ट या टीझरमध्ये करते. मग हृषिकेषचा सायकलची गोष्ट सांगण्याचा प्रवास सुरू होतो. भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव हे प्रवासीही सायकलच्या या प्रवासात दिसतात.

प्रकाश कुंटे यांनी ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘& जरा हटके’, ‘हंपी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘& जरा हटके’ या चित्रपटातून कुंटे यांनी एक प्रगल्भ प्रेमकथा मांडली होती. या चित्रपटांनंतर प्रकाश आता ‘सायकल’ हा चित्रपटा घेऊन येत आहेत. हा टीझर पाहता चित्रपटाही आश्वासक वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 1 =