चौफेर न्यूजविद्यार्थ्यांमध्ये उद्योजक कौशल्य वाढवावे, या उद्देशाने सुदुंबरे येथील सिध्दांत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्राचार्य डॉ. सागर मंजारे, राज किशोर श्रीवास्तव,  नितीन श्रीराओ, डॉ. प्रताप पवार, प्रा. जेना जोशी, प्रा. संतोष गाडे उपस्थित होते. राज किशोर श्रीवास्तव म्हणाले, पॅरोकिअल दृष्टिकोनच्या पलीकडे जाण्याची आणि स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. एसजीएसएमएसचे प्राचार्य डॉ. सागर मंजारे म्हणाले की, उद्योजक कौशल्ये विकसित करण्याची आवश्यकता आहे. संघर्ष असूनही मोठी स्वप्ने पाहा.

मुन्ना समल  म्हणाले विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्वतःचे पथ बनवावे आणि यशस्वी उद्योजक व्हावे. गुरविजीत म्हणाले की उद्योजिक फनेल हे उत्तम माध्यम आहे. ज्यायोगे विद्यार्थ्यांना नोकरीच्या दृष्टीने जीवनशैलीपेक्षाही जाण्याची क्षमता प्राप्त होऊ शकते. डॉ. अतुल कुमार यांच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेलचे अभिनंदन केले.  डॉ. अमित अरुण मेढेकर यांचे राजकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते  ऑपरेशन सृष्टी व संशोधन या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. याचे लेखन करण्यासाठी ठाकूर प्रकाशनांनी सन्मानित केले. डॉ. जीनी सक्सेना यांनी आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. सुरेखा सुरेश नेंगुले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − 12 =