पिंपरी (दि. 12 फेब्रुवारी 2017) – पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारानिमित्त शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेचे सोमवारी आकुर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेस संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्‍हे, जलसंपदामंत्री विजय शिवतरे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार डॉ. निलम गोऱ्हे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे यांच्यासह सेनेचे सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख राहुल कलाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी 2017) सायंकाळी 5.00 वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ मंदिरासमोरील शेंबेकर कंपनी मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
निमंत्रण : शिवसेना शहर प्रमुख राहूल कलाटे  —  9822058992

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 2 =