साक्री – आजच्या धकाधकीच्या जिवनात पालकांचे पाल्यांवरील लक्ष कमी होत आहे. टीव्ही, मनोरंजानाच्या या जगात महिलांनी आदर्शवत होण्याची आवश्यकता असून स्त्री जातीने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा, असे मत साक्री येथील प्री प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी व्यक्त केले. स्कूलमध्ये दि. ३ जानेवारी गुरुवार रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे उपस्थित होते. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील माहिती शाळेतील शिक्षीका हिरल सोनवणे यांनी सांगितली. त्या म्हणाल्या की,  सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली झाला. १८४० मध्ये महात्मा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सन १८४७ मध्ये त्यांनी आपल्या ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने शाळेची स्थापना केली. अनेक संकटातून मार्गक्रमण करून त्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, स्त्रिया पुढे याव्यात यासाठी प्रयत्न केल्याचे सोनवणे यांनी सांगितले. शाळेच्या प्राचार्य भारती पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 17 =