चौफेर न्यूज –   पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २६ कोटी ३९ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

ममहापालिकेच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र.२८ येथील रहाटणी मनपा शाळा ते पिंपळे सौदागर स्मशानभुमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्ल्यु.टी. पध्दतीने काँक्रीटीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ६ कोटी २६ लाख १० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. स्थापत्य विभागाकडील पिंपळे सौदागर आरक्षण क्र.३७१ येथील उर्वरीत उद्यानाची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ५ कोटी ३० लाख ७७ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१६ मध्ये किवळे मामुर्डी मधील रस्त्याला फुटपाथ करणे, स्टॉर्म वॉटर व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २१ लाख ५६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१७ परिसरामध्ये विविध कंपन्या मनपा मार्फत खोदण्यात आलेले चर दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे १६ लाख ९४ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाच्या विविध विभागांकडील संगणक देखभाल व दुरूस्तीकरिता येणा-या सुमारे ५७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१७  परिसरामध्ये हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ३० लाख ०७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र १८ मधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती खडीमुरूम व बीबीएम पद्धतीने चर, क्रॉसक्ट व खड्डे भरण्यासाठी येणा-या सुमारे २३ लाख ९० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिॆचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती शिल्प समूह येथे आवश्यक राष्ट्रध्वज खरेदी करण्यासाठीच्या सुमारे ४ लाख २० हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र.२४ मधील वाकड पोलीस चौकी ते काळाखडक रोड व प्रभागातील इतर परिसरातील डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ३३ लाख १५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या जलनि:सारण विभागाकडील कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.७ मधील अमृत योजना वगळून गव्हाणेवस्ती परिसरातील मलनि:सारण विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २८ लाख ६६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

बोपखेल गावासाठी कायम स्वरूपी पुल व पोहच रस्ता बांधणे तसेच पादचा-यांसाठी पूल बांधणे आदी कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाकडील ड गटातील वाहनांची दुरूस्ती करणेकामी १ वर्षे कालावधीकरिता येणा-या सुमारे १ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × one =