पिंपरी चिंचवड : स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना मेट्रोच्या बाऊंसरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काल रात्री मडिगेरी महापालिकेच्या मुख्यालयात गाडी घेऊन जात होते. त्यावेळी त्यांची गाडी अडवुन मेट्रोचे काम करणार्‍या ठेकेदारांच्या बाऊंसरनी अरेरावीची भाषा करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा निषेध करत बुधवार (दि.10) स्थायी सभा तहकूब करण्यात आली. मेट्रोचे काम सर्व नियम धाब्यावर ठेऊन सुरु आहे. सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर असतानाच, कुठल्याही सूचना न देताच रस्ता बंद करून कामे सुरु केली आहेत. फलक, सूचना कुठल्याही नियमांचे पालन न केल्याने प्रवाशांची दिशाभूल होते आहे. याचाच अनुभव स्थायी सभापती विलास मडिगेरी यांना आला. महापालिका मुख्यालयात गाडी घेऊन जाताना, सभापतींच्या गाडीला अडवुन मेट्रोच्या ठेकेदारांच्या बाऊंसरनी अरेरावीची भाषा केली. तसेच दमबाजी करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा निषेध करत बुधवार (दि.10) स्थायी सभा तहकूब करण्यात आली. याप्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला असून, मेट्रोच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांच्याशी या विषयावर उद्या चर्चा करू, असे आश्‍वास आयुक्तांनी दिले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 1 =