पिंपरी : स्पार्क फिल्म फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तिसर्‍या लघुचित्रपट महोत्सवात ’जीवनामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी दृष्टीकोन ठेवा’ असा विषय असलेल्या एफपीए (ऋझ-) यांचा ’श्रद्धा’ या लघुचित्रपटाला प्रथम क्रमांक मिळाला. या महोत्सवामध्ये एकूण 12 लघुचित्रपट प्रदर्शित करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक, लेखक, निर्माते राहुल भंडारे, दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख शेठ भालेकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, युवा नेते अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात पार पडले.
तसेच ’नगण्य जीवनट हा विषय असलेला डॉ. नितीन महाजन यांचा ’मच्छर’ या लघुचित्रपटाने दुसरा क्रमांक पटकावला, तर ’संभाषण’ वर आधारित असलेला चैतन्य काबे यांचा ’एक फोन कॉल’ या लघुचित्रपटाने तिसरा क्रमांक पटकावला. तर उत्तम दिग्दर्शन -निलेश ओहोळ (72 मिनिटे), उत्तम कॅमेरा – चैतन्य काबे (अपॉईंटमेंट) जूरी अवॉर्ड – ’सेलीब्रेशन’ या लघुचित्रपटाला मिळाला. वरील सर्व पारितोषिक विजेते लघुचित्रपट सीजीकॅम अँड्रॉईड टीव्ही अ‍ॅपवर पाहता येणार आहेत.
या महोत्सवाचे बक्षीस वितरण दिग्दर्शक नागेश दरक, चित्रपट निर्माते शंकर तोवर, दिशा फाउंडेशनचे सचिन साठे, गुरुदास भोंडवे आणि स्पार्क फाउंडेशनचे चिराग फुलसुंदर यांच्या हस्ते करण्यात आले.
चित्रपट हे एक असे मध्यम आहे की छोटीशी गोष्टसुद्धा चांगल्या पद्धतीने एका वेळी खूप लोकांपर्यंत प्रभावी पणे
मांडता येते.
चित्रपट निर्मितीची आवड असल्या शिवाय उत्कृष्ट चित्रपट तयार होत नाही. उत्कृष्ट चित्रपट बनवण्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नाही, असे मत राहुल भंडारे यांनी व्यक्त केले. स्पार्क फाउंडेशननी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अशा स्पर्धा घेऊन उत्तम प्रकारचे व्यासपीठ तयार केले आहे, असेही ते म्हणाले. सतीश अडसूळ, शार्दुल लिहिणे, मयूर जोशी, संदीप पंडित यांनी या महोत्सवातील लघुचित्रपटांचे परीक्षण केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले तर तेजस चव्हाण यांनी प्रास्ताविक आणि गुरुदास भोंडवे यांनी आभार मानले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विनय पुजारी, शिवानंद स्वामी, दत्ता गुंजाळ, अभिषेक काटे, बन्सी वाघमारे यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + sixteen =