पिंपरी चिंचवड ः क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील विद्यामंदिर येथे पहिल्यांदाच स्पोर्टस मॅनेजमेंटच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. निबंध स्पर्धेसाठी खेलो इंडिया हा विषय देण्यात आला होता.

या स्पर्धेत इयत्ता 5 वी मधील प्रथमेश गजधाने, इयत्ता 6 वी मधील श्रीपाद डोंगरे व इयत्ता 7 वी मधील पायल गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सौरभ गायकवाड, तेजस्विनी मोरे, प्रतीक भोसले, अपेक्षा थोरात यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक प्रांजल गायकवाड, स्नेहल राठोड, सोनाली कदम, रिया हवडे, नेहा सातारकर यांनी प्राप्त केला. विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला स्पोर्टस मॅनेजमेंटचे अध्यक्ष सी.ए. अमित जगताप, स्पोर्टसचे सदस्य सुरज वाघमारे, साळुंके काका, शिवा सुरवसे व खिंवसरा पाटील विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप, शुभांगी कानेटकर, विदुला पेंडसें आदी उपस्थित होते. सामाजिक कार्य करण्याचे उत्तेजन देण्यासाठी वनवासी कल्याण निधी या सामाजिक कार्यक्रम अंतर्गत सर्वाधिक निधी गोळा करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा रोडे, ओंकार साठे, आदित्य थोरात यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =